शिवछत्रपतींच्या नावावर बाजार मांडलेल्या गद्दारांना गाडा :  विनायक राऊतांचं आवाहन 

<p>शिवछत्रपतींच्या नावावर बाजार मांडलेल्या गद्दारांना गाडा :  विनायक राऊतांचं आवाहन </p>

कोल्हापूर – आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केवळ टक्केवारीत अडकलेल्या आणि  शिवछत्रपतींच्या नावावर बाजार मांडलेल्या गद्दारांना गाडण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केले आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी, ज्या रस्त्याला गेली १० वर्षे डांबर मिळाले नाही तो रस्ता गद्दार सेनेच्या मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री येणार म्हणून रातोरात करण्यात आला आणि कोल्हापूरकरांना समजेना सूर्य नेमका कुठून उगवला ? अशा शब्दात लोणार वसाहतीत करण्यात आलेल्या रस्त्यावरून त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला. यावेळी आमदार सुनील प्रभु यांनी, कोल्हापुरातील अॅनाकोंडा प्रवृत्तीच्या गद्दार राजकारण्यांना हद्दपार करण्याचे आवाहन केले.