उपमुख्यमंत्र्यांनी जमीन व्यवहार रद्द झाला म्हटलं तरी.... हा व्यवहार रद्द होणार नाही...
पुणे – पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमिनीच्या बेकायदेशीर व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच कोंडीत सापडले होते. त्यांचा या व्यवहाराशी काही संबंध आहे का ? अशी चर्चा रंगत असतानाच त्यांनी, पार्थ पवार यांच्यासंदर्भातील जमीन व्यवहार रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. मात्र, जोपर्यंत व्यवहारातील कंपनीशी संबंधित असलेल्या शीतल तेजवानी स्वत: निबंधक कार्यालयात हजर राहत नाहीत, तोपर्यंत हा व्यवहार रद्द होणार नाही, असे सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाने यांनी सांगितले आहे.
या व्यवहाराशी संबंधित शीतल तेजवानी या फरार असल्याची माहिती असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काहीही म्हटले तरी, हा व्यवहार शीतल तेजवानी यांच्याशिवाय रद्द होणार नाही हे आता नक्की झाले आहे. याशिवाय, हा व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी नाही, तर 42 कोटी रुपये पार्थ पवार यांच्या कंपनीला भरावे लागणार आहे. त्यामुळे पार्थ पवारांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.