राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर...: खा. शरद पवार
अकोला – पार्थ पवारांच्या कंपनीने जमीन व्यवहाराबाबत केलेल्या गैरव्यवहारावर खा. शरद पवार यांनी नुकताच प्रतिक्रिया दिली आहे. “प्रशासन, राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर, आमची विचारधारा आणतो”, असे खा. शरद पवार यांनी म्हटले आहे.
जमीन व्यवहाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला आहे का? असा प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण हा गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जर मुख्यमंत्रीच हा गंभीर विषय असल्याचे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून त्याचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे.