मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून केलं बेताल वक्तव्य...शेतकऱ्यांमधून संताप
मुंबई - सत्तेमध्ये बसलेल्या मंत्र्यांकडून शेतकऱ्यांबाबत वारंवार बेताल वक्तव्य केले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत असताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुक्ताफळे उधळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
‘सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्ज माफ करून घ्यायचं, आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, हे अनेक वर्ष काम चालू असल्याचे’ वक्तव्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.