रूपाली चाकणकरांवर टीका करणं भोवलं : रूपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून नोटीस... 

<p>रूपाली चाकणकरांवर टीका करणं भोवलं : रूपाली ठोंबरे पाटील यांना पक्षाकडून नोटीस... </p>

पुणे – फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून अजित पवार पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील आणि महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यात सुरु असलेल्या वादाच्या ठिणगीची दखल पक्षाने घेतली आहे. पक्षाने थेट रूपाली ठोंबरे पाटील यांना नोटीस बजावली आहे.
ज्यात महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्याबद्दल तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, असे म्हटले आहे. तसेच  यावर सात दिवसात खुलासा देण्यास सांगितले आहे.  एकाच पक्षातील दोन महिला नेत्यांमध्ये सुरु असलेल्या वादावादीमुळे अजित पवारांच्या पक्षात नेमकं काय चाललंय अशी विचारणा आता होवू लागली आहे.