कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नास हजार कुटुंबांना लवकरच घरकुलांच्या चाव्या देणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

<p>कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नास हजार कुटुंबांना लवकरच घरकुलांच्या चाव्या देणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर</p>

कोल्हापूर - लवकरच कोल्हापूर जिल्ह्यातील पन्नास हजार कुटुंबांना घरकुलांच्या चाव्या देणार असल्याची घोषणा  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केली. राधानगरी तालुक्यातील ठिकपूर्ती येथे अन्नसुरक्षा योजने अंतर्गत गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप, प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी आदेश वाटप, ११० घरकुल  आणि संजय गांधी योजनेची पाचशे लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, मतदार संघातला माणूस बघून नाही तर गरज बघून विकासकामे करत असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी माजी उपसभापती अरुण जाधव, माजी सरपंच चंद्रकांत संकपाळ, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय बलुगडे, सरपंच प्रल्हाद पाटील, अरविंद भंडारी, युवराज पोवार, पी. डी. चौगले, सागर ढेरे, बाजीराव ढेरे, ग्रामविकास अधिकारी एन. एस पाटील आदी उपस्थित होते.