पार्थ पवार यांच्या कंपनीचा जमीन घोटाळा अन् तहसीलदार निलंबित...
मुंबई – पुण्यात जमिनीच्या आर्थिक व्यवहारातून होत असलेल्या घडामोडीमुळे राजकारणात उलट- सुलट चर्चांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या जमीन व्यवहाराचा घोटाळा समोर आला आहे.
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये विकत घेतली आहे. आणि हा सर्व व्यवहार केवळ 500 रुपयांच्या स्टँपड्युटीवर झाल्याने खळबळ उडाली आहे.
या घोटाळया प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानंतर, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि हवेली क्रमांक-3 चे दुय्यम उपनिबंधक रविंद्र तारु यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.