कोल्हापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमात साऊंड कर्मचाऱ्याला विजेचा धक्का...
कोल्हापूर – आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी मार्केट यार्ड येथे आयोजित करण्यात आलेल्या गटप्रमुखांच्या मेळाव्यात साऊंड सिस्टीमचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला विजेचा धक्का बसला. त्यामुळे ऐन मेळाव्यात गोंधळ उडाला. वेळीच त्या कर्मचाऱ्याने हात झटकल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी त्या कर्मचाऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.