…तोपर्यंत कुणीही न्याय देणार नाही : उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद 

<p>…तोपर्यंत कुणीही न्याय देणार नाही : उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांशी साधला संवाद </p>

बीड - “शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. जोपर्यंत शेतकरी म्हणून एकवटत नाही, तोपर्यंत कुणीही न्याय देणार नाही. शेतकऱ्यांनी आपली ताकद दाखवून द्यावी”, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

“आडल्यानडल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या खाईतून बाहेर काढले नाही, तर तो पुन्हा उभा राहणार नाही, जर मातीला कोंब फोडता, तर सरकारच्याही अन्यायाविरोधात पाझर फोडू शकत नाही का?” अशी विचारणा त्यांनी केली आहे. जेव्हा आंदोलनासाठी हाक दिली जाईल, तेव्हा प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरा. हाच न्याय मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे”, असे त्यांनी म्हटले आहे.