कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणार : अ‍ॅड. रामहरी रूपणवर

<p>कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणार : अ‍ॅड. रामहरी रूपणवर</p>

कोल्हापूर -  आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत काँगेसचे जिल्हा प्रभारी माजी आमदार अॅडव्होकेट रामहरी रुपणवर यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

 मेळाव्याच्या सुरूवातीला काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना अॅडव्होकेट रामहरी रुपणवर यांनी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यालयातून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, आपापल्या भागातील मतदारयाद्या तपासून त्यातील त्रुटी दुरुस्ती करून घ्याव्यात, अशा सुचना त्यांनी दिल्या.

सत्तेचा गैरवापर करून केंद्र आणि राज्य सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत आहे, असा आरोप त्यांनी केला. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिकेत काँग्रेसचा महापौर होणार आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत काँग्रेसचा अध्यक्ष होणार, असा विश्वासही काँग्रेसचे जिल्हा प्रभारी माजी आमदार अॅडव्होकेट रामहरी रुपणवर व्यक्त केला.

 यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सुजाता शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.  मेळाव्याला विधानसभा प्रभारी मृणाल पाटील, रहीम हट्टीवाले, शिवाजीराव मोहिते, नंदकुमार जाधव, विराज शिंदे, शाहीन शेख, राजेंद्र शेलार, राहुल गायकवाड, सत्यजीत जाधव, राहुल देसाई, सूर्यकांत पाटील, बुद्धीहाळकर, सरलाताई पाटील,  बाळासाहेब सरनाईक, शशांक बावचकर, तोफिक मुल्लानी, सदाशिव चरापले, शेखर पाटील, संजय पोवार-वाईकर, विनायक घोरपडे, सर्व ब्लॉक अध्यक्ष, नूतन तालुकाध्यक्ष, माजी नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.