'हे महाशय महापालिका निवडणुकीत मतांसाठी मराठीचा गळा घोटायला निघालेत' : आ. रोहित पवार संतापले

<p>'हे महाशय महापालिका निवडणुकीत मतांसाठी मराठीचा गळा घोटायला निघालेत' : आ. रोहित पवार संतापले</p>

मुंबई – शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल एका कार्यक्रमात ‘मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. एकवेळ आई मेली तरी चालेल. पण मावशी मरायला नको’, असे वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावर त्यांनी आता माफी सुद्धा मागितली आहे परंतु आ.रोहित पवार हे या वक्तव्यावर चांगलेच संतापले आहेत.  


आ. रोहित पवार यांनी ट्वीटमध्ये म्हटलय कि, ‘मतांसाठी किती लाचारी करावी माणसाने…! महाशक्तीने कुबड्या काढून घेण्याच्या हालचाली सुरु होताच हे महाशय महापालिका निवडणुकीत मतांसाठी मराठीचाही गळा घोटायला निघालेत. ज्यांना मराठीरुपी आईची किंमत नाही त्यांना उद्या मुंबईची काय किंमत राहील?’, असा संताप व्यक्त केला आहे.