‘अखेर भाजपने आमचा आरोप मान्य केला...’: विरोधकांकडून मंत्री आशिष शेलारांचे स्वागत
मुंबई - राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज राज्यातील मतदान यादीतील घोळावर पत्रकार परिषद घेवून दुबार मतदारांचा पाढा वाचला. यावेळी त्यांनी जातीवरून विरोधकांवर टीकाही केली परंतु त्यांच्या या टीकेला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आ. रोहित पवार, मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी, आशिष शेलार यांनी आम्हाला फुलटॉस चेंडू टाकला आहे. मुळात त्यांनी आमचा आरोप मान्य केला आहे. मतदारयाद्यांमधील घोळ त्यांनी मान्य केले केल्याचे म्हणत त्यांचे स्वागत केले आहे. अखेर राज्यातील मतदान यादीत घोळ झाल्याचं भाजपला पटलं असल्याचा आनंद विरोधक व्यक्त करत आहेत.