‘...तर सर्व खेळांमध्ये भारतीय महिलांचं राज्य दिसेल’ : राज ठाकरेंकडून महिला भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन
मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाने मिळवलेल्या दैदिप्यमान यशामुळे सर्व खेळाडूंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करून भारतीय महिला क्रिकेट संघाचं अभिनंदन केले आहे.
राज ठाकरे यांनी म्हटले आहे कि, “महिला विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंनी जेतेपदावर नाव कोरलं. यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे मनापासून अभिनंदन... या आधी २ वेळा विजेतेपदाची हातातोंडाशी आलेली संधी निसटली होती पण यावेळेस मात्र दैदिप्यमान कामगिरी करत त्यांनी विश्वचषक खेचून आणला... भारतीय महिला क्रिकेटला असंच यश मिळत राहील हे नक्की आणि यातूनच देशांत महिलांमध्ये क्रीडा संस्कृती अधिक खोल रुजेल आणि फक्त क्रिकेटच नाही तर सर्व खेळांमध्ये भारतीय महिलांचं राज्य दिसेल... पुन्हा एकदा महिला भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन !”