जय महाराष्ट्र !...‘नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन’ : खा. संजय राऊतांकडून पत्रक प्रसिद्ध 

<p>जय महाराष्ट्र !...‘नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन’ : खा. संजय राऊतांकडून पत्रक प्रसिद्ध </p>

मुंबई – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, ‘सर्व मित्र परिवार आणि कार्यकर्त्यांसाठी नम्र विनंती, असे म्हणत एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ज्यात त्यांनी आरोग्याच्या कारणास्तव काही दिवसांसाठी सार्वजनिक जीवनातून दूर राहणार असल्याचे म्हटले आहे. 

त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, 
जय महाराष्ट्र !
“आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले. उपचार सुरू आहेत, मी यातून लवकरच बाहेर पडेन. वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यास नाईलाज आहे. मला खात्री आहे मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षात आपल्या भेटीस येईन. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.” असे म्हटले आहे त्यामुळे ते इथून पुढे राजकारणात दिसणार नसल्याचे समोर आले आहे.