सगळे माझ्याच गळ्याला का लटकतात?: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची खदखद  
									
																		आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर क्यूआर कोड असलेले मोठे होर्डिंग्ज दिसणार...
 
																	नवी दिल्ली – सध्या रस्त्यांना पडलेले खड्डे आणि यामुळे होणारे अपघात त्यामुळे निकृष्ट बांधकामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर वारंवार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारले जातात त्यामुळे त्यांची खदखद बाहेर पडली आहे. 
दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, रस्त्यांमध्ये खड्डे पडल्यास समाज माध्यमांवर आणि पत्रकार फक्त माझा फोटो छापतात आणि मलाच टीकेला सामोरे जावे लागते, मी एकटाच का शिव्या खाऊ? खराब रस्त्यांसाठी कंत्राटदाराचा फोटो, सल्लागाराचा फोटो आणि सचिवासह कार्यकारी अभियंत्यांचा फोटोही छापला जावा. त्यांच्यावरही टीका व्हायला हवी. सगळे माझ्याच गळ्याला का लटकतात? सोशल मीडियावर मीच का उत्तर देत बसू? त्यामुळे आता ही सर्व माहिती जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय मी घेतला आहे." असे म्हणत त्यांनी आता देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर क्यूआर कोड (QR Code) असलेले मोठे होर्डिंग्ज लावण्याचे आदेश दिले असल्याचे सांगितले.
