धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर केला रद्द

<p>धर्मादाय आयुक्तांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहार अखेर केला रद्द</p>

पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणी राजकारण सुरु होतं. अखेर त्या जमिनीचा व्यवहार धर्मादाय आयुक्तांनी रद्द केला आहे.

गोखले बिल्डर्स आणि जैन बोर्डिंग ट्रस्ट यांच्यात कोथरुड येथील जागेसंदर्भात मोठा आर्थिक व्यवहार झाला होता. शिवसेना नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी या प्रकरणी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तब्बल 3000 कोटींच्या घरात हा व्यवहार असून मोठा भ्रष्टाचार व जैन बोर्डिंगची जमीन लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले होते. त्यानंतर, वरिष्ठ पातळीवर दबाव येताच, मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या व्यवहारातून आपले हात काढून घेतले. तर, गोखले बिल्डर्सनेही हा व्यवहार रद्द करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आता कायदेशीर मार्गाने हा व्यवहार रद्द झाला आहे.