संघटित ताकद कायम ठेऊन निवडणुकीला सामोरे जाऊया : आ. सतेज पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर – संघटित ताकद कायम ठेऊन आगामी निवडणुकीला सर्वांनी ताकदीनिशी सामोरे जाण्याचे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाड मधील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत सर्वांनी एकजुटीने राहून, कुरुंदवाड नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवत काँग्रेसचा नगराध्यक्ष करण्याचा निर्धार केला. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी काँग्रेस पक्ष म्हणून कुठंही कमी पडणार नाही. कुरुंदवाडच्या पाणी प्रश्नासह सर्व प्रलंबित प्रश्नांचा ठामपणे पाठपुरावा करण्याची ग्वाही देऊन त्यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटीत राहण्याचे आवाहन केले.
श्री दत्त उद्योग समुहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी, कुरुंदवाड नगरपरिषदेवर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवून पुन्हा एकदा जयराम बापू पाटील यांचे विचार पुढे घेऊन जाऊया, असं आवाहन केलं.
यावेळी विजय पाटील, दादासाहेब पाटील, जवाहर पाटील, बाळासाहेब दिवटे, सुनील चव्हाण, विनायक घोरपडे, साताप्पा बागडी, दीपक परीट, वासिम पठाण, एम. एम. मतवाल, सचिन मोहिते, तानाजी आलासे यांच्यासह कुरुंदवाड मधील कार्यकर्ते उपस्थित होते.