‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ : विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी फोनवरून फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबियांशी साधला संवाद...
नवी दिल्ली - फलटणच्या डॉक्टर तरुणीने केलेल्या आत्महत्येमुळे राज्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या डॉक्टर तरुणीला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी मागणी सर्व स्तरावरून होत असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी त्या डॉक्टर तरुणीच्या कुटूंबियांशी फोनवरून संपर्क करून मराठीतून संवाद साधला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पिडीत कुटूंबाचं सांत्वन केलं. यावेळी या घटनेत आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी पीडित कुटुंबाकडून करण्यात आली यावेळी राहुल गांधी यांनी हे सर्व ऐकून घेतले. 'तुम्हाला आता काय हवंय ? ' असं राहुल गांधीनी विचारताच पीडित कुटुंबांनी या प्रकरणी 'SIT चौकशी आणि आरोपींना फाशी' या दोन्ही गोष्टीची मागणी केली. यावेळी राहुल गांधींनी होकार देत तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे आश्वासन दिले.