खा. शरद पवार, अजित पवार यांच्या शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश...

<p>खा. शरद पवार, अजित पवार यांच्या शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश...</p>

मुंबई – खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ.जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते सदस्य असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. 
शुगर इन्स्टिट्यूटला अनुदानाचा योग्य विनियोग होतोय का नाही याची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. तपास करून अहवाल शासनाला पाठवण्याचा आदेश देण्यात आला आहे.