पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा या उपक्रमाद्वारे साजरा होणार

<p>पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा या उपक्रमाद्वारे साजरा होणार</p>

कोल्हापूर - 'पुढारी' वृत्तपत्राचे मुख्य संपादक, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ८० वा वाढदिवस येत्या ५ नोव्हेंबर रोजी 'सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा' या विशेष उपक्रमाद्वारे साजरा होणारय. या निमित्ताने कोल्हापूरात नागरी गौरव समितीची बैठक आज कोल्हापूरमधील धैर्यप्रसाद हॉल इथं बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीला खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, खासदार धैर्यशील माने, डॉ. योगेश जाधव, व्ही. बी. पाटील, महेश जाधव, महादेवराव आडगुळे आदी मान्यवर उपस्थित होते. बैठकीत पार्किंग, वाहतूक, सुरक्षा, पोलिस प्रशासनाचे नियोजन, विविध स्पर्धा, ग्रंथ प्रकाशन, तसंच वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक आणि जनहिताचे उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी, हा लोकसोहळा अधिक भव्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. असं आवाहन केलं पालकमंत्री आबिटकर यांनी, हा लोकोत्सव सर्वपक्षीय आणि सर्व क्षेत्रातील लोकांचा असावा असं सांगितलं.

मंत्री मुश्रीफ यांनी, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा ८० वा वाढदिवस मोठ्या दिमाखात साजरा करूया असं सांगितलं.

डॉ. योगेश जाधव यांनी, सोहळ्याला ५ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊला सुरुवात होणार असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, आजी माजी आमदार आणि समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं.

खासदार धैर्यशील माने यांनीही मनोगत व्यक्त केलं. बैठकीला माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सर्वपक्षीय पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.