अखेरला काही काळानंतर माणसाचं वय थांबायला भाग पाडतं : शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्यांचे निवृत्तीचे संकेत
मुंबई – “१० वर्ष मी नगरसेवक होतो, २० वर्ष मी आमदार आहे. ज्याचं कधी स्वप्न पाहिलं नाही ती सर्व पदे आपण भोगली. अखेरला काही काळानंतर माणसाचं वय थांबायला भाग पाडतं. आपण तिथपर्यंत विचार करायचा नाही. कधीतरी मध्येच थांबायचं का? हा प्रश्न माझ्या मनामध्ये काल आला”, असे म्हणत शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी निवृत्तीचे संकेत दिले आहेत. ते एका कार्यक्रमात बोलत होते. त्यांच्या या विधानामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.
“मी अल्पसंतुष्ट असा व्यक्ती आहे. हे पाहिजे किंवा ते पाहिजे अशी मला कधीही इच्छा नव्हती आणि नाही. त्यामुळे आता कुठेतरी थांबायला पाहिजे”, असेही ते म्हणाले आहेत.