शेतकऱ्यांना मदत दिली गेली नसल्याने देशाला थरकाप उडेल असं मोठं आंदोलन...: मनोज जरांगेंचा इशारा

बीड - शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदतीचे तात्पुरते आश्वासन सरकारने दिलं होतं. मात्र शेतकऱ्यांना मदत दिली गेली नाही. त्यामुळं देशाला थरकाप उडेल असं मोठं आंदोलन उभं करु, असा इशारा मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यासाठी राज्यभरातील शेतकरी संघटनेचे नेते आणि संघटनांना अंतरवाली सराटीत बोलावणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मनोज जरांगे म्हणाले कि, मंत्रिमंडळाने काढलेला जीआर रद्द करता येत नाही. आम्हाला दिलं म्हणून फडणवीसांनी मराठ्यांची मनं जिंकली. प्रमाणपत्र वाटपाची जबाबदारी फडणवीसांची आहे.
अंतरवाली सराटीत शेतक-यांच्या प्रश्नावर बैठक घेऊन आंदोलनाविषयी चर्चा करणार आहे. मात्र शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत गावात निवडणूक साहित्य किंवा बॅलेट पेपर घेऊन यायचं नाही असंही मनोज जरांगेंनी सांगितलं आहे. शेतक-यांचं सगळं उद्धवस्त झालं आणि तुम्ही मजा बघता. समाज शांत आहे म्हणून त्याला फडणवीसांनी हिणवू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे