आ. सतेज पाटील यांनाही दुचाकी मागून म्हैस पळवण्याचा मोह अनावर...
कोल्हापूर - बेंदूर सणा प्रमाणे दिवाळी पाडव्याला आपल्या घरात समृध्दी आणणाऱ्या पशुंबद्दल कोल्हापूरकर अनोख्या पध्दतीनं कृतज्ञता व्यक्त करतात. सायलेन्सर काढलेल्या दुचाकी मागून म्हैशींना पळवणे हा अनोखा प्रकार आणि त्याच्या स्पर्धा फक्त कोल्हापूरातच होत असाव्यात. यंदा सुध्दा दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने कसबा बावड्यात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. सतेज पाटील यांनाही दुचाकी मागून म्हैस पळवण्याचा मोह आवरता आला नाही.
शिंगाना मोरपीस, पायात घुंगरांचे चाळ, गळ्यात कवड्यांची माळ आणि म्हैस मालकांचा उत्साह अशा वातावरणात कसबा बावड्यातील मार्केट परिसरात ही स्पर्धा रंगली होती.