महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट : आ. सतेज पाटील

कोल्हापूर - महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरून केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी आघाडी होईल तर काही ठिकाणी स्वतंत्र लढा द्यावा लागेल. याबाबत मनसेसोबत युतीचा अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नसल्याचे सांगत, याबाबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल असे त्यांनी सांगितले आहे.