ऊस दराबाबत काळम्मा बेलवाडी आणि हमिदवाडा कारखाना प्रशासनाला निवेदन

<p>ऊस दराबाबत काळम्मा बेलवाडी आणि हमिदवाडा कारखाना प्रशासनाला निवेदन</p>

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जयसिंगपूर मधील ऊस परिषदेतील निर्णयानुसार यंदा ऊसाला विनाकपात पहिली उचल ३७५१ रूपये द्यावी, अशी मागणी संघटनेच्यावतीनं काळम्मा बेलवाडीतील सर सेनापती संताजी घोरपडे आणि हमिदवाडा इथल्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखाना प्रशासनाकडं करण्यात आलीय. याबाबत कार्यवाही झाली नाही तर ११ नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय.

जयसिंगपूर इथल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन विनाकपात ३७५१ रूपये आणि मागील हंगामातील दोनशे रूपये देण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर संघटनेच्यावतीनं काळम्मा बेलवाडीतील सर सेनापती संताजी घोरपडे आणि हमिदवाडा इथल्या लोकनेते सदाशिवराव मंडलिक कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन ऊस परिषदेत झालेल्या निर्णयानुसार दर देण्याची मागणी केली. याबाबत कार्यवाही झाली नाही तर 11 नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष अॅड संदीप चौगुले, संभाजीराव यादव, नामदेव भराडे, नितेश कोगनोळे, पंढरीनाथ www nan पाटील, उत्तम भांबरे, प्रमोद मगदूम, सुधीर पाटील, आदि उपस्थित होते