एक अर्ज केल्यानंतर लगेच कोटींचं कर्ज कसं मिळतं ? : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन खरेदीवर राजू शेट्टींचा सवाल

कोल्हापूर – सध्या पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्रीवरून भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ आणि शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यात आरोप - प्रत्यारोप सुरु आहेत. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी, फेसबुक पोस्ट करून जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
राजू शेट्टी यांनी, जमीन विक्रीची ट्रस्टींना खरच गरज आहे का ? याची तपासणी धर्मादाय आयुक्तांनी केली नाही, तशी तपासणी करण्याऐवजी त्यांनी तात्काळ जमीन विक्रीला परवानगी दिली त्यामुळे धर्मादाय आयुक्तांची नियुक्ती संशयास्पद असल्याचं त्यांनी म्हटले आहे.
जमीन खरेदीसाठी गोखले बिल्डर्सला ५० कोटींचं कर्ज अर्ज केल्यानंतर लगेचच कसं दिलं, हे कसं काय शक्य आहे. मोहोळ यांनी हा व्यवहार रद्द करायला हवा,तसेच जमीन खरेदीसाठी एक अर्ज केल्यानंतर कर्नाटकातल्या सीकोडीतील अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ५० कोटींचं लगेच कसं मंजूर होतं. त्यात मुरलीधर मोहोळ यांचा मंत्री म्हणून सहभाग असल्याशिवाय एवढ्या लगेचच कर्ज मंजूर कसं होतं. सीकोडीतील क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब हे भाजपचे माजी खासदार आहेत याला योगायोग म्हणायचा का, या व्यवहाराला बेकायदेशीररित्या मान्यता देणारे कलोते नावाचे धर्मादाय आयुक्त आहे,आहेत ते मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यालाही योगायोग म्हणायचा का, एवढे सर्व योगायोग एकाच प्रकरणात कसे येऊ शकतात, याचेही उत्तर मिळायला हवं, असेही राजू शेट्टींनी म्हटले आहे.