ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज : आ. सतेज पाटील

<p>ग्रामीण भागातील मुला-मुलींच्या उच्च शिक्षणासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज : आ. सतेज पाटील</p>

कोल्हापूर – काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आपण स्वतः दत्तक घेऊन  तसेच लोकसहभागातून शैक्षणिक सुधारणा करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. सतेज पाटील यांनी केले.हातकणंगले तालुक्यातील संभापूर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दिव्यांग लाभार्थ्यांना 1 लाख २८ हजार रुपयांचा दिव्यांग निधी वाटप करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

 त्याचबरोबर गावातील घरफाळा आणि पाणीपट्टी भरलेल्या नागरिकांना दिवाळीनिमित्ताने साखर वाटप करण्यात आली तर महिला बचत गटांना लखपती दीदी ग्राम अनुदानाचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, संभापूर ग्रामपंचायतीने सातत्याने जिल्ह्यात वेगळेपणाचा ठसा कायम ठेवला असल्याचे सांगितले. लोकांच्या हिताची कामे सरपंचांसह सर्व सदस्य करत असल्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले.

माजी सरपंच प्रकाश झिरंगे यांनी, आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून गावाचा कायापालट झाल्याचे सांगितले. पूर्वी ग्रामपंचायत विठ्ठल मंदिरात होती मात्र आ. सतेज पाटील हे पालकमंत्री असताना त्यांनी निधी दिल्याने ग्रामपंचायत इमारत बांधता आली, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रगतशील शेतकरी सर्जेराव मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला सरपंच आक्काताई झिरगे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, माजी नगरसेवक मोहन सालपे, ग्रामसेविका गीता कोळी, मारुती भोसले, राजू मिरजकर, तानाजी भोसले, शितल कारंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.