राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायतींच्या निवडणुका डिसेंबर अखेरीस...?

मुंबई – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील रखडलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया जानेवारीअखेरपर्यंत पूर्ण करावी असे आदेश दिले आहेत. २० जानेवारीपूर्वी सर्व प्रक्रिया पार पाडण्याचा राज्य निवडणूक आयोगाचा प्रयत्न सुरुय. त्यानुसार महानगरपालिका, नगरपलिका व नगरपंचायती, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची तयारी राज्य निवडणूक आयोगाने सुरू केलीय. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या निवडणुका होतील. या निवडणुका नोव्हेंबर अखेर घेण्याची योजना होती. पण त्या बहुधा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होतील, असे निवडणूक आयोगाकडून सूचित करण्यात आलंय. डिसेंबर अखेरीस राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि ३३६ पंचायतींच्या निवडणुका होतील. अखेरच्या टप्प्यात १५ ते २० जानेवारीच्या दरम्यान राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. जानेवारी अखेर सर्व निवडणुकांची प्रक्रिया पार पाडण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे..