“BCCI आणि केंद्र सरकारने अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्यावेत.” - खासदार प्रियांका चतुर्वेदी

पाकिस्तानने पक्तिका प्रांतातील अनेक जिल्ह्यांत हवाई हल्ले केले. या हवाई हल्ल्यात ३ अफगाण क्रिकेटपटू मारले गेले. हे राष्ट्रहिताचे कारण पुढे करत अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरोधात होणारी टी-२० मालिका रद्द केली आहे. यावर खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी प्रतिक्रिया दिली. “BCCI आणि केंद्र सरकारने अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्यावेत.” असा टोला लगावला आहे.
जर अफगाणिस्तान आपल्या खेळाडूंवर हल्ला झाल्यानंतर खेळ रद्द करू शकतो, तर भारतानेही पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट संबंधांबाबत कठोर भूमिका घ्यायला हवी. जो देश सतत भारतविरोधी कारवाया करतो, अशा देशाशी केवळ "खेळ" म्हणून संबंध ठेवणं योग्य नाही, असा देखील टोला लगावला आहे