राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन 

<p>राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन </p>

अहिल्यानगर – राहुरीचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
कर्डिले यांनी सरपंच म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते काही काळ कार्यरत होते. 2009 मध्ये  त्यांनी भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. 2009 ते 2014 असे 10 वर्षे त्यांनी राहुरीचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला होता.