उंचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीधर कदम यांची बिनविरोध निवड

<p>उंचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी श्रीधर कदम यांची बिनविरोध निवड</p>

कोल्हापूर - उंचगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच शिवानी पाटील यांचा कार्यकाळ संपल्यानंतर उपसरपंच पदाचा त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर नूतन उपसरपंच निवडीपूर्वी उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज आमदार सतेज पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. यानंतर उंचगाव ग्रामपंचायतच्या झालेल्या विशेष सभेत उपसरपंच पदासाठी प्रक्रिया राबवण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मधुकर चव्हाण होते. यावेळी श्रीधर कदम यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन उपसरपंच कदम यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उंचगावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

यावेळी सदस्य शिवानी पाटील, शिला मोरे, तुषार पाटील, सारिका माने, वैजयंती यादव, विराग करी, सुनीता चव्हाण, अरविंद शिंदे, नीता हावळ, संदीप पाटील, राहुल मोळे, मयुरा चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र गाढवे उपस्थित होते. दरम्यान या निवडीनंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना, एक महिन्याचे वेतन त्याचबरोबर दिवाळी बोनस म्हणून कर्मचाऱ्यांना दोन वेतनाच्या रकमेचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.