गुजरातमधील 16 मंत्र्यांनी दिला राजीनामा...मंत्रिमंडळात मोठा फेरबदल

<p>गुजरातमधील 16 मंत्र्यांनी दिला राजीनामा...मंत्रिमंडळात मोठा फेरबदल</p>

गांधीनगर – गुजरात राज्य सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असतानाच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता 16 मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळातील या मोठ्या फेरबदलानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज रात्री 8 वाजता सर्व मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी बोलावलं आहे. त्यानुसार नवीन मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता होणार असल्याची माहिती समोर येत आहे.