'पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं...' : भाजप प्रदेशाध्यक्षांचा  मंत्र्यांना इशारा 

<p>'पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं...' : भाजप प्रदेशाध्यक्षांचा  मंत्र्यांना इशारा </p>

मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांनी मंत्र्यांना 'पक्षाकडे लक्ष द्या, तुमच्या कामाचं मूल्यांकन सुरू आहे', असा इशारा दिला आहे. मंत्र्यांसोबत झालेल्या  बैठकीत त्यांनी हा इशारा दिला आहे.  

मंत्र्यांना पालकमंत्रिपद असलेल्या जिल्ह्यांमध्ये अधिक सक्रिय होण्यास सांगण्यात आले आहे तसेच पक्षांतर्गत मतभेद मिटवून निवडणुकीसाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांची कामं करण्यावर भर देण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.