आमदार निवासातील उपाहारगृहावरील कारवाई नावापुरतीच...
आ.संजय गायकवाडांनी धुलाई केलेल्या उपाहारगृहाला 'क्लीन चिट'

मुंबई – काही दिवसांपूर्वी आमदार निवासातील उपाहारगृहामध्ये शिळे अन्न दिलं जातं असल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी उपाहारगृहामधील कर्मचाऱ्याची चांगलीच धुलाई केली होती. यानंतर या उपाहारगृहाचा अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना निलंबित करण्यात आला होता. त्याच उपहारगृहाला अन्न व औषध प्रशासनाने 'क्लीन चिट' दिली आहे. त्यामुळे केलेली कारवाई ही नावापुरती होती का ? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
‘कॅन्टीनमध्ये कोणतेही अवैध खाद्यपदार्थ आढळून आले नाहीत’, असे अन्न व औषध प्रशासनाने म्हटले आहे.