‘आरएसएस’वर कायमची बंदी घातली पाहिजे : पद्मश्री प्रा. लक्ष्मण माने

<p>‘आरएसएस’वर कायमची बंदी घातली पाहिजे : पद्मश्री प्रा. लक्ष्मण माने</p>

कोल्हापूर – सध्या अनेक विघातक घटना घडत आहेत. त्यामुळे याच्या मुळाशी असणाऱ्या आरएसएस संघटनेवर कायमची बंदी घातली पाहिजे, अशी मागणी पद्मश्री प्राध्यापक लक्ष्मण माने यांनी केली आहे. शहरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात धम्म संघाच्या वतीने ६९ व्या धमक्रांती दिना निमित्त धम्मदेसना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.

 कार्यक्रमाला प्राध्यापक अशोक चोकककर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माने यांनी, धम्माचे सामूहिक चिंतन या विषयावर मार्गदर्शन केले. भारत बौद्धमय करेन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न अपूर्ण राहिले. ते पूर्ण करायची जबाबदारी आपली असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सर्व जातींमध्ये सर्वात मोठा शत्रू अहंकार आहे. अशा सगळ्या परिस्थितीत माणूस म्हणून उभारण्याचा आणि गुलामगिरीतून मुक्त होण्याचा धम्म हा एकमेव मार्ग असल्याचे प्राध्यापक माने यांनी सांगितले.

आपण स्वतः ४२ जमाती एकत्र करून धम्म स्वीकारला. या जमातीं मध्ये अनेक रूढी परंपरा होत्या. त्या परंपराचा ऐतिहासिक दाखल देत त्यांना आपण मूळचे बौद्ध असल्याचे पटवून देण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. ब्राह्मण आणि आरएसएस सोडून बहुतांश जाती, जमाती या बौद्ध आहेत. हे सर्वांना ऐतिहासिक संदर्भ देऊन सांगायला आपण कमी पडतो आहे. या कामात आपण स्वतःला झोकून दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

प्रा. अशोक चोकाककर यांनी, येत्या काळात जास्तीत जास्त ऐतिहासिक संदर्भासह विविध जातींना धम्माविषयी माहिती देऊन जास्तीत जास्त धम्मप्रसार करण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टर डी एल कांबळे, महाबोधी पद्माकर, प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत करणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.