मतदान याद्यांची लपवाछपवी कशासाठी..?

सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पत्रकार परिषद... 

<p>मतदान याद्यांची लपवाछपवी कशासाठी..?</p>

मुंबई – निवडणूक आयोग मतदान याद्यांची लपवाछपवी कशासाठी करत आहे, राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्याच दाखविणार नसेल तर काहीतरी घोळ असल्याचा आरोप सर्वपक्षीय नेत्यांनी केला आहे. राज्य निवडणूक आयोगाशी चर्चा झाल्यानंतर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेतली.
यावेळी राज ठाकरे यांनी, आयोगाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असलेल्या मतदारांची यादी वाचून दाखवली त्यामध्ये एका मतदाराचे वय ११७ तर दुसऱ्या मतदाराची १२४ आहे. यावरुन घोळ स्‍पष्‍ट होतो. जर मतदार यादीच पारदर्शी नसेल तर निवडणूक घेवू नका. स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका गेली पाच वर्ष घेतलेल्‍या नाहीत. तुम्‍ही आधी निवडणूक मतदार यादीतील घोळ संपवा, सहा महिन्‍यानंतर निवडणुका घेतल्‍याने काही फरक पडत नाही, असेही त्‍यांनी सांगितले. 
यावेळी उद्धव ठाकरे यांनी, आयोगाशी भेट घेताना भाजपलाही पत्र दिलं होतं परंतु ते आले नाहीत. मुळात मतदार घोटाळ्यावर आम्हाला सत्ताधाऱ्यांनी उत्तर देणे अपेक्षीत नसून निवडणूक आयोगाने यावर उत्तर द्यावे, असा टोला त्यांनी लगावला.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्य शशिकांत शिंदे, काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.