निवडणूक रद्द करा : मनसेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज परत निवडणूक आयोगाला घेरलं... 

<p>निवडणूक रद्द करा : मनसेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज परत निवडणूक आयोगाला घेरलं... </p>

मुंबई – काल मनसेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेवून मतदान यादीतील त्रुटीबाबत सवाल उपस्थित करत मागण्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर आज पुन्हा मनसे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयुक्तांना घेरले आहे.
मतदान याद्या आम्हाला द्या, आम्ही शहानिशा करू, सत्य स्वीकारून आगामी निवडणुका रद्द करा, कोर्टाला आयोगाची तयारी नसल्याचे सांगून निवडणूक पुढे ढकला, अशी  मागणी नेत्यांकडून केली जात आहे. मतदान यादीतील त्रुटीशिवाय निवडणुका कशा घेता असे सवालही उपस्थित करण्यात आले आहेत.
यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कॉंग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात  यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर नेते यावेळी निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत.