ऊस वाहतूक खर्चावरून कारखानदारांना गुडघे टेकायला लावणार : राजू शेट्टी

<p>ऊस वाहतूक खर्चावरून कारखानदारांना गुडघे टेकायला लावणार : राजू शेट्टी</p>

कोल्हापूर – अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शासनाकडून चेष्टा सुरू आहे. सरसकट ऊस वाहतूक खर्चामुळे शेतकऱ्यांचा टनाला ४४० रुपये तोटा होतो. ऊस वाहतूक खर्चावरून कारखानदारांना गुडघे टेकायला लावणार असून यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. जयसिंगपूरमध्ये होणाऱ्या ऊस परिषदेच्या अनुषंगाने करवीर तालुक्यातील दोनवडेत संपर्क सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी, मुख्यमंत्र्यांनी लाजत लाजत का असेना काटामारी सुरू असल्याचे कबूल केल्याचे सांगितले. काटामारीतून निवडणुकीसाठी पैसा काढला जातो असा आरोप करत त्यांनी कारखानदारांचा समाचार घेतला. कारखान्याजवळच्या उसाचा वाहतूक खर्च लांब अंतरावरून आणणाऱ्या उसाला देऊन शेतकऱ्यांचे नुकसान केले जातं असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महादेव कळके या सभेच्या अध्यक्षस्थानी होते.  

यावेळी बळीमामा पाटील, रामभाऊ चेचर, उत्तम पाटील, जगन्नाथ पाटील विक्रम पाटील, सुनिल कापडे यांनी मनोगतं व्यक्त केली. यावेळी तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, बाजीराव देवाळकर, सुनील कापडे, कुंडलिक केंबळेकर, बाजीराव सुळेकर, सरपंच सर्जेराव शिंदे, तुकाराम गुरव, नाथा चव्हाण, ज्ञानदेव पाटील, शिवाजी शिंदे, सागर हळदकर, शंकर मगदू‌म, रंगराव साळोखे, संजय कदम, शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते.