महसूलमंत्र्यांच्या ‘या’ पत्रामुळे जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार...

<p>महसूलमंत्र्यांच्या ‘या’ पत्रामुळे जिल्हा परिषद अन् पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार...</p>

 मुंबई – राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतर्गत जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन सदस्यांची स्वीकृत सदस्य म्हणून नेमणूक करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा करण्यात यावी,  असे विनंती पत्र पाठवले आहे, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा होणार असल्याने अनेकांना संधी मिळणार आहे. 
या पत्राला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या अनुषंगाने ग्रामविकास विभागाला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या असल्याने या सुधारणेनंतर ग्रामविकासात्मक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी समाजाभिमुख कार्यकर्त्याला मिळेल, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.