मतदान यादीतील घोटाळ्यासाठी सर्व पक्षीय नेते आले एकत्र... निवडणूक आयुक्तांना दिले निवेदन

मुंबई - राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदान याद्यावरून मोठा घोळ झाला आहे. यावर आज सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत राज्यातील मुख्य निवडणूक आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले आहे.
यासाठी मंत्रालयाजवळच्या शिवालय बंगल्यात खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, अंबादास दानवे यांच्यासह अनेक मुख्य नेते दाखल झाले होते.
निवडणूक प्रक्रियेवर शंका असल्याने सर्वपक्षीय शिष्टमंडळाने चर्चा करण्यासाठी राज्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेट दिली आहे. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी आयुक्तांपुढे अनेक प्रश्न उपस्थित केले. जिथं, दोन दोन ठिकाणी मतदारांचे नाव कसं? वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं? असे सवाल उपस्थित केले. तर, विधानसभा निवडणुकीआधी 18 नोव्हेंबरला आम्ही आयोगाला पत्र देत खोटे मतदार नोंदणी झाल्याची बाब अधोरेखित करत त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याचा सूर आळवला. यावेळी शिष्टमंडळाकडून VVPAT उपलब्ध नाहीत, मग बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, अशी मागणी केली.