कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात एईची तांत्रिक मदत घेणार : पालकमंत्री

<p>कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात एईची तांत्रिक मदत घेणार : पालकमंत्री</p>

कोल्हापूर – लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि तांत्रिक क्षेत्रातील संस्थांनी जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र येण्याची गरज आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासात एईचे सहकार्य घेण्याची ग्वाही  पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.  असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनिअर्स कोल्हापूरच्या वतीने अभियंता दिन, जागतिक वास्तुशास्त्र दिन आणि जागतिक अधिवास दिन एकत्रितपणे साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

 पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी, जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त शबरीश पिल्लई, राज्याच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी, पुरातत्व अभ्यासक सचिन पाटील, कार्यक्रमाचे प्रायोजक आय स्टॉर्न कार पार्किंग सिस्टीम्सचे संचालक प्रमोद पाटील यांची उपस्थित होती.

असोएिशन ऑफ आर्किटेक्टस् अँड इंजिनियर्स कोल्हापूरच्या वतीने गोदरेज प्रॉपर्टीजचे व्हाईस प्रेसिडेंट इंजिनिअर सतीश दत्तात्रय जाधव  आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जॉईंट प्रोजेक्ट प्रेसिडेंट इंजिनिअर चंदरभान मनोहर मनवानी यांना मानद सभासदत्व प्रदान करण्यात येत असल्याचे व्हाईस प्रेसिडेंट विजय चोपदार यांनी जाहीर केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी, एईने प्रशासनाला शासकीय प्रकल्पांसाठी होणारा खर्च योग्य पध्दतीने होतोय का याची खात्री करण्यासाठी एआय आधारीत टूल विकसित करुन द्यावे, असे आवाहन केले.महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी, कोल्हापूर महापालिकेला एईचे नेहमीच सहकार्य लाभत असून आर्किटेक्टस् आणि इंजिनियर्स यांच्यासाठी महापालिका इज ऑफ डुईंग बिझनेस संकल्पनेचा प्रभावी वापर करेल असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला एईचे सेक्रेटरी राज डोंगळे, माजी प्रेसिडेंट रमेश पवार, संजय आवटे, संजय आडके, विजय कोराणे, संदीप घाटगे, दिलीप जाधव, क्रिडाई महाराष्ट्रचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, एईचे खजानिस उमेश कुंभार संचालक अनिल घाटगे आदी मान्यवर उपस्थित होते.