एक – दोन नव्हे, राज्य सरकारने बंद केल्या ‘या’ सात योजना..: ठाकरे गटाने जाहीर केली बंद केलेल्या योजनांची यादी  

<p>एक – दोन नव्हे, राज्य सरकारने बंद केल्या ‘या’ सात योजना..: ठाकरे गटाने जाहीर केली बंद केलेल्या योजनांची यादी  </p>

मुंबई – राज्य सरकारने एक – दोन म्हणत तब्बल सात योजना बंद केल्या आहेत. याची यादी नुकतीच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्वीट करून प्रसिध्द केली आहे. त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे कि, “सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील. शिंदेंच्या या योजना बंद.. 
१. आनंदाचा शिधा- बंद! 
२. माझी सुंदर शाळा - बंद! 
३. १ रुपयात पीकविमा - बंद!
 ४. स्वच्छता मॉनिटर - बंद! ५. 
१ राज्य १ गणवेश - बंद! 
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद!
 ७. योजनादूत योजना - बंद! ८.
 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद! 
या योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू”