जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडती नव्यानं घेण्यात येणार......

<p>जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडती नव्यानं घेण्यात येणार......</p>

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील 12 पंचायत समित्यांच्या सभापती पदांवरील आरक्षण निश्चित करण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. या अनुषंगाने, आज सोमवार दि. 13 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11.30 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. तथापि तांत्रिक कारणास्तव ही आरक्षण सोडत कार्यवाही नव्याने घेणे आवश्यक असल्याने आज संध्याकाळी 5.00 वाजता पुन्हा ही सोडत आयोजित करण्यात आली आहे. या विशेष सभेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, कागल, आजरा, चंदगड, हातकणंगले, शिरोळ आणि गडहिंग्लज या 12 पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.