"अनंत तरे असते तर हे कावळे फडफडले नसते" – उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष शिंदेंवर हल्लाबोल

<p>"अनंत तरे असते तर हे कावळे फडफडले नसते" – उद्धव ठाकरे यांचा अप्रत्यक्ष शिंदेंवर हल्लाबोल</p>

ठाणे -  'अनंत तरे एकदा मला म्हणाले होते – हाच माणूस आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. मी त्यांना समजावले. तुम्ही सगळे असताना तो दगा देईल कसा? पण दुर्दैवाने त्यांनी जे भाकीत केलं होतं, तेच घडलं.' अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिवंगत नेते अनंत तरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आज जे लोक ‘वाचवा-वाचवा’ असा हंबरडा फोडत आहेत, तेच काल दगा देणारे होते. जर अनंत तरे यांचे मी ऐकले असते, तर आज पश्चात्ताप झाला नसता,' असा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष हल्ला चढवला. 2014 साली ठाणे विधानसभा मतदारसंघात अनंत तरे यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या जोरदार मागणीनंतर रवींद्र फाटक यांना तिकीट देण्यात आलं आणि यामुळे तरे नाराज झाले होते. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.