कोल्हापुरात 51 व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन, विजेत्यांचा गौरव

कोल्हापूर – कोल्हापुरातील पोलीस ग्राउंडवर पार पडलेल्या 51 व्या पोलीस क्रीडा स्पर्धांचा शनिवारी सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जीएसटी विभागाचे अतिरिक्त आयुक्त शबरीस पिल्लई होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आपल्या मनोगतात सर्व विजेत्या संघांचे आणि खेळाडूंना अभिनंदन करत त्यांच्या कामगिरीचं कौतुक केलं.
महिला आणि पुरुष विभागात सुरुवातीपासूनच पोलीस मुख्यालय संघानं दबदबा कायम ठेवला होता. पुरुषांच्या संघाने ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप सोबत फुटबॉल, कबड्डी ,खो-खो या क्रीडा प्रकारात विजेतेपद पटकावलं, तर महिला ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप सह बास्केटबॉलमध्ये देखील प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर शहर उपविभाग पुरुष हॉकी संघानं विजेतेपद पटकावलंय. जयसिंगपूर इचलकरंजी उपविभागानं पुरुष हँडबॉल स्पर्धेत आणि महिलांच्या हॉलीबॉल संघानं, तर शाहुवाडी गडहिंग्लज विभागानं महिलांच्या खोखो,पुरुषांच्या हॉलीबॉल तर करवीर उपविभाग संघानं जलतरण मधील चॅम्पियनशिप पटकावलंय. बेस्ट ॲथलिट अमृत तिवले, सोनाली सोनवणे हे दोघेही स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, महापालिका प्रशासक के. मंजूलक्ष्मी, वन विभाग अधिकारी धैर्यशील पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू, पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, सुवर्णा पत्की, प्रिया पाटील, सुजित कुमार क्षीरसागर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह विविध पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.