ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं : मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य 

<p>ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावं : मंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य </p>

जळगाव – सध्या सत्तेत असलेल्या वाचाळवीरांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. पक्षाकडून समज देवून देखील आमदार तसेच मंत्र्यांकडून होणारे वादग्रस्त वक्तव्य काही थांबण्याचे नाव घेत नाही. सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
लोक दुष्काळ पडला तरी पुढाऱ्यांना शिव्या देतात, दुष्काळ नाही पडला तरी शिव्या देतात. शिव्या ऐकणे आम्हा पुढाऱ्यांचा धंदाच आहे. त्यामुळे ज्याला शिव्या ऐकायच्या असतील त्यानेच आमदार व्हावे, असे वादग्रस्त विधान मंत्री गुलाबराव पाटील  यांनी केले. ते एका कार्यक्रमात व्यासपीठावरून बोलत होते.