“मला लष्करी अधिकाऱ्याचा अनादर करायचा नाही, मात्र ऑपरेशन ब्लू स्टार...”: पी. चिदंबरम

<p>“मला लष्करी अधिकाऱ्याचा अनादर करायचा नाही, मात्र ऑपरेशन ब्लू स्टार...”: पी. चिदंबरम</p>

नवी दिल्ली -  “मला एकाही लष्करी अधिकाऱ्याचा अनादर करायचा नाही. मात्र १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू स्टार ज्या प्रकारे राबवण्यात आलं ते चुकीचं होतं. ज्याची किंमत इंदिरा गांधींना त्यांचा जीव गमावून चुकवावी लागली”, असल्याचे वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केले आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.
दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे ऑपरेशन राबवलं. मात्र सैन्य सुवर्ण मंदिरात बुटांसह शिरलं आणि तिथे रक्ताचे सडे पडले त्यामुळे शिख धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. ज्यामुळे इंदिरा गांधींची हत्या झाली. 
ऑपरेशन ब्लू स्टार हे लष्कर, पोलीस, गुप्तचर विभाग या सगळ्यांनी मिळून घेतलेला निर्णय होता. त्यामुळे या निर्णयासाठी फक्त इंदिरा गांधींना दोष देता येणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.