“एस फॉर ए” विकास आघाडी लढवणार कोल्हापूर महापालिकेची निवडणूक – राजू माने यांची घोषणा

कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी “एस फॉर ए विकास आघाडी” संपूर्ण ताकदीनिशी रिंगणात उतरणार असल्याची माहिती आघाडीचे अध्यक्ष राजू माने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मागील निवडणुकीत आघाडीने ३० पेक्षा अधिक प्रभागांमध्ये उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत सर्वच प्रभागांमध्ये स्वतःचे उमेदवार उभे करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या रणनीतीवर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे माने यांनी स्पष्ट केले.
“एस फॉर ए” विकास आघाडी ही स्थानिक पातळीवर कार्यरत एक सामाजिक-राजकीय चळवळ असून, शहर विकास आणि स्थानिक प्रश्नांवर ठाम भूमिका घेण्यासाठी ही आघाडी ओळखली जाते.