"लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय " : अजित पवार गटाच्या मंत्र्याकडून खळबळजनक वक्तव्य

<p>"लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय " : अजित पवार गटाच्या मंत्र्याकडून खळबळजनक वक्तव्य</p>

मुंबई – ‘लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय’, असं खळबळजनक वक्तव्य  अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. त्यांनी  कर्जमाफीवरून केलेल्या या वक्तव्यामुळे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.  शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होवू लागल्यानंतर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी, ‘कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा असल्याचे म्हणत दिलगिरी व्यक्त केली आहे.