इचलकरंजी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची आहे : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

इचलकरंजी – इचलकरंजी महापालिकेची निवडणूक महायुती म्हणूनच लढवायची असल्याचे नामदार प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे. आज दुपारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी इचलकरंजीत बैठक घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधत निवडणुकीचा बिगुल वाजवला. या बैठकीला खा. धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्यांदाच होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी, इचलकरंजी महापालिकेवर भगवा फडकवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. राज्यातील महायुती सरकारमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य हे घटक पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित लढवतील. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती शक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
या बैठकीला शहरप्रमुख भाऊसाहेब आवळे, माजी उपनगराध्यक्ष रवि रजपूते, महादेव गौड, प्रकाश पाटील, वैशालीताई डोंगरे, स्नेहांकिता भंडारे, रुपालीताई चव्हाण आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.